| हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही |
| हसलो म्हणजे दुखीः नव्हतो ऐसे नाही |
| हसलो म्हणजे फ़क्त स्वतःच्या फ़जितीवर |
| निर्लज्यागत दिधली होती स्वतःच टाळी |
| हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही |
| डोळ्यामधे पाणी नव्हते ऐसे नाही |
| हसतो कारण तुच कधी होतीस म्हणाली |
| याहुन तव चेहर्याला काही शोभत नाही |
| हसतो कारण तुला विसरणे जितके अवघड |
| तितके काही गाल पसरणे अवघड नाही |
| हसतो कारण दुसर्यानांही बरे वाटते |
| हसतो कारण तुला सुद्धा ते खरे वाटते |
| हसलो म्हणजे फ़क्त डकवली फ़ुले कागदी |
| आतुन आलो होतो बहरुन ऐसे नाही |
| हसतो कारण जरी बत्तीशी कुरुप आहे |
| खाण्याची अन दाखवण्याची एकच आहे |
| हसतो कारण सत्याची मज भिती नाही |
| हसतो कारण हसण्यावाचुन सुटका नाही.... |
| "हसलो" च्या जागी "हसतो" नक्की कुठल्या कडव्यात सुरु होते |
| यामध्ये confusion आहे....pls correct if its wrong.... |
हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही
Subscribe to:
Post Comments (Atom)
KHUP CHAAN
ReplyDeleteI LIKE YOUR KAVITA COLLECTION. KHUPACH CHAN
ReplyDeleteLai Bhari......
ReplyDeleteNaaaaaadddd Khulllaaaaaaaaaaaaaa
ReplyDeleteekdam zyyak
ReplyDeletekhop chan
Deletebole to solied baba!!!!!!!!!!!!!
ReplyDelete