| बॉस ..... |
| बॉस खुप उशिरापर्यंत थांबायचा आणि वैताग आणायचा... |
| लाल लाल कंटाळल्या डोळ्यांनी काम करत रहायचा... |
| आम्ही घरी निघालो की चुकचुकायचा... |
| मी लग्नाळलेला... वाटायचं- 'चांगलं घरी जायचं सोडून |
| कसलं हे उकरून उकरून काम करत रहाणं !'... |
| यथावकाश माझं लग्न झालं... |
| नव्या नवलाईचे पक्षी घरटं सोडेना झाले... |
| बघता बघता 'अतिपरिचित' झाले.... |
| आणि हळूहळू पंख सैलावत जाताना |
| घरटयाची हाक आत तेवढीशी तीव्र उरली नाही... |
| आता बॉसला 'थांब' सांगावं लागत नाही... |
| केबिनमध्ये तो आणि केबिनबाहेर मी |
| एकमेकांना सोबत करत बसलेलो असतो... |
| कंटाळ्यातील भागीदारांच्या समजुतदारपणाने |
| घरी न जाता काम करत रहाण्याची 'अनिवार्यता' |
| दोघांनाही आता घट्ट धरून ठेवते... |
| उकरून उकरून काम करत प्रश्नांशी भांडत बसण्यापेक्षा |
| उकरून उकरून काम करणे सोपे असते, |
| हे निर्जन ऑफिसमधल्या सुन्न रात्रींशी |
| गुपचुप कबुल केलेए आहे मी... |
| - संदिप खरे |
बॉस .....
Subscribe to:
Post Comments (Atom)
ekdum mast
ReplyDeletezakassssssssssssss
strange but true.....strange but true.....
ReplyDeleteRishiraj Pandit.