बॉस ..... |
बॉस खुप उशिरापर्यंत थांबायचा आणि वैताग आणायचा... |
लाल लाल कंटाळल्या डोळ्यांनी काम करत रहायचा... |
आम्ही घरी निघालो की चुकचुकायचा... |
मी लग्नाळलेला... वाटायचं- 'चांगलं घरी जायचं सोडून |
कसलं हे उकरून उकरून काम करत रहाणं !'... |
यथावकाश माझं लग्न झालं... |
नव्या नवलाईचे पक्षी घरटं सोडेना झाले... |
बघता बघता 'अतिपरिचित' झाले.... |
आणि हळूहळू पंख सैलावत जाताना |
घरटयाची हाक आत तेवढीशी तीव्र उरली नाही... |
आता बॉसला 'थांब' सांगावं लागत नाही... |
केबिनमध्ये तो आणि केबिनबाहेर मी |
एकमेकांना सोबत करत बसलेलो असतो... |
कंटाळ्यातील भागीदारांच्या समजुतदारपणाने |
घरी न जाता काम करत रहाण्याची 'अनिवार्यता' |
दोघांनाही आता घट्ट धरून ठेवते... |
उकरून उकरून काम करत प्रश्नांशी भांडत बसण्यापेक्षा |
उकरून उकरून काम करणे सोपे असते, |
हे निर्जन ऑफिसमधल्या सुन्न रात्रींशी |
गुपचुप कबुल केलेए आहे मी... |
- संदिप खरे |
बॉस .....
Subscribe to:
Post Comments (Atom)
ekdum mast
ReplyDeletezakassssssssssssss
strange but true.....strange but true.....
ReplyDeleteRishiraj Pandit.